Accident  Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Bike Accident : कुत्रा अचानक आडवा आल्याने दुचाकीवरील दोघा भावांचा मृत्यू

फणसोप हायस्कूलच्या मागे बायपास रोडवरील घटना

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः भरधाव दुचाकीसमोर अचानकपणे कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. अपघाताची ही घटना रविवारी, 1 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वा. सुमारास फणसोप हायस्कूलच्या मागे बायपास रोडवर घडली. दुचाकीवरून तिघेजण जात असताना यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा, तसेच त्याच्या मागे बसलेला त्याचा सख्ख्या भावाचा मृत्यू झाला असून, तिसरा स्वार जखमी झाला आहे.

जयप्रकाश चंद्रिका यादव (वय 53) आणि त्याचा भाऊ ओमप्रकाश चंद्रिका यादव (51, दोन्ही मूळ रा. गाझीपूर, उत्तर प्रदेश सध्या रा. फणसोप सडा, रत्नागिरी) या दोघांचा मृत्यू झाला. याबाबत संभाजी बंकट हुलगे (21, मूळ रा. लातूर सध्या रा. फणसोप सडा, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री जयप्रकाश यादव आपल्या ताब्यातील दुचाकी (एम.एच. 08 बीजे 3856) वर मागे त्याचा सख्खा भाऊ ओमप्रकाश आणि संभाजी हुलगे यांना ट्रिपल सिट बसवून पावस ते रत्नागिरी रस्त्याने येत होता. त्यांची दुचाकी फणसोप हायस्कुलच्या मागे बायपास रोडवर आली असता दुचाकीसमोर अचानकपणे कुत्रा आडवा आला. त्यामुळे जयप्रकाश यादवचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी रस्त्याच्या साईड पट्टीच्या बाहेर जाउन अपघात झाला. यात यात रस्त्याच्या बाजूचे चिरे-दगड डोक्याला लागून जयप्रकाश यादव व ओमप्रकाश यादव गंभिर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर संभाजी हुलगेलाही दुखापत झाली. अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT