Accident  Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Accident : भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

शिळ येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः शिळ येथे भरधाव कारची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या यल्लाप्पा दऱ्याप्पा जगधने (31, मूळ सांगोला, सोलापूर) या तरुणाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कार चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 30 जानेवारीला दुपारी 1 वा. घडली होती. कार चालकाने पळ काढला होता. अनिल संगप्पा येनेगुरे (57, मूळ रा. निलंगा, लातूर सध्या रा. बोर्डिंग रोड सन्मित्रनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल कार चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल अमिता पाटील यांनी तक्रार दिली आहे. येनेगुरे हा कार (एमएच-08-झेड-3265) घेऊन रत्नागिरी ते करबुडे असा जात होता. त्याचवेळी रवीराज विठोबा राजगे (24, रा. डेरवण फाटा सावर्डे, चिपळूण) हा दुचाकी (एमएच-45-एके-2872) वर पाठीमागे यल्लाप्पा जगधने याला घेउन जाताना ही दुर्घटना घडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT