महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीची लेखी परीक्षा पुढे ढकलली file photo
रत्नागिरी

Ratnagiri News| महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीची लेखी परीक्षा पुढे ढकलली

प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत घेण्यात येणारी महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीची लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी ही परीक्षा रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित करण्यात आली होती, मात्र, आता ही परीक्षा सुधारित तारखेनुसार रविवार, दि. १७ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली.

शासन, महसूल व वन विभाग (मुंबई) यांच्या १ ऑक्टोबर २०२६ च्या पत्रानुसार ही लेखी परीक्षा १५ नोव्हेंबर रोजी चिपळूण तालुक्यातील दोन उपकेंद्रांवर निश्चित करण्यात आली होती. यामध्ये डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण आणि युनायटेड इंग्लिश मीडियम स्कूल, चिपळूण या परीक्षा उपकेंद्रांचा समावेश होता. दरम्यान, शासनाच्या १२ नोव्हेंबर २०२६ च्या नवीन आदेशानुसार रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजीची ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता ही परीक्षा १७ जानेवारी २०२७ रोजी पार पडणार आहे. तरी सर्व संबंधित उमेदवारांनी या बदललेल्या तारखेची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT