Ratnagiri Crime News 
रत्नागिरी

Ratnagiri Crime| वर्ष उलटले तरी वैशाली शेट्ये यांच्या हत्येचे गूढ कायम!

न्यायासाठी मुलगी पोहोचली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : तालुक्यातील रापाटण येथे वैशाली शांताराम शेट्ये (वय ६८) या वृद्ध महिलेचा राहत्या घरी खून होऊन वर्ष उलटले तरी हत्येचा उलगडा झालेला नाही. आईच्या हत्येला जबाबदार असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा व्हावी, यासाठी त्यांच्या मुलीने आता जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. जानवी जयेश पाथरे (माहेरचे नाव रूपाली शेट्ये) यांनी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी तक्रार दाखल करून तपासाच्या प्रगतीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

वैशाली शेट्ये यांचा १५ ऑक्टोबर २०२५ रोजी रायपाटण येथील राहत्या घरी खून झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र वर्षभरानंतरही हत्येमागील सत्य समोर आलेले नाही. तपासाची सद्यस्थिती काय आहे व दोषी व्यक्तीचा शोध का लागलेला नाही, याबाबत मुलीने नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कायद्यानुसार शिक्षा मिळवून देण्याची मागणी केली आहे. आईला न्याय मिळावा व हत्येमागील सत्य उघड व्हावे, हीच आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. वर्षभरात तपासाबाबत वारंवार विचारणा करूनही समाधानकारक माहिती मिळाली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

वेरवलीतील खुनाचा उलगडा, रायपाटणचा तपास रखडला?

वेरवली येथील खून प्रकरणाचा अवघ्या दोन दिवसांत उलगडा झाल्याचा संदर्भ देत रायपाटण येथील हत्येचा तपास अद्याप निष्कर्षापर्यंत का पोहोचलेला नाही, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान विजय गुरव (४०, रा. शाहूवाडी) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या संशयाला अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याने हत्येचे गूढ कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT