Leopard Attack  File Photo
रत्नागिरी

Leopard Attack Rajapur | राजापुरातील खिणगिणी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

खिणगिणी-कुणबीवाडी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Cow Killed By Leopard Rajapur

राजापूर : तालुक्यातील खिणगिणी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, दोन दिवसांपूर्वी बिबट्याने चार वर्षांच्या गायीवर हल्ला करून तिची शिकार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे खिणगिणी-कुणबीवाडी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खिणगिणी-कुणबीवाडी येथील शेतकरी कृष्णा हरी डोंगरकर यांची गुरे रानात चरण्यासाठी गेली होती. गावातील जुने नवलादेवी मंदिर आणि भातशीचे कुट परिसरात बिबट्याने त्यांच्या चार वर्षांच्या गायीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाय ठार झाली.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून मृत गायीचा पंचनामा करण्यात आला. यात शेतकरी कृष्णा डोंगरकर यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पंचनामा करताना रवींद्र डोंगरकर, दत्ताराम डोंगरकर, माजी सरपंच विजय पाध्ये, पोलीसपाटील अशोक डोंगरकर, रमेश डोंगरकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी

परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे. गुरे चरण्यासाठी रानात सोडताना शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला असून, वनविभागाने या परिसरात तातडीने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT