संतोष कुमार झा यांनी या तिघांना ही प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अवॉर्ड जाहीर करून ते तात्काळ त्यांना प्रदान करण्यात आले. (Pudhari File)
रत्नागिरी

Youth Saved From Train | ट्रेनखाली जाणार होता तरुण, पण आरपीएफच्या धाडसामुळे बचावला

Ratnagiri Railway Station Incident | रत्नागिरी रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडताना सुदैवाने टळली.

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडताना सुदैवाने टळली. चालत्या ट्रेन मधून बेजबाबदार पणे उतरणारा तरुण पडला आणि ट्रेन खाली जात होता, पण प्लॅटफॉर्म वर सेवेत असलेल्या दोन आरपीएफ आणि एक विक्रेत्याच्या सतर्कतेने त्याचे प्राण वाचले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

शनिवारी सकाळी 6.41 वा. सुमारास एल टी टी - सावंतवाडी रेल्वे रत्नागिरी च्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर दाखल झाली. ट्रेन प्लॅटफॉर्म वर थांबण्यापूर्वीच त्यातील एका तरुणाने ट्रेन मधून उतरण्याचा प्रयत्न केला. या चुकीच्या प्रयत्नांत हा तरुण चालत्या ट्रेन च्या खाली येणार होता. पण तो पडताच प्लॅटफॉर्म वर कार्यरत असलेल्या कोकण रेल्वेच्या दोन आरपीएफ जवान आणि एका विक्रेत्याने सतर्कता दाखवत त्याला वेगाने बाजूला ओढले.

त्यामुळे रेल्वेखाली जाण्यापासून त्याचे प्राण वाचले. कोकण रेल्वेचा आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांनी त्याला वेळीच ओढत ट्रेन खाली जाण्यापासून वाचवले. त्याच्या बरोबर प्रवास करीत असलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहिती नुसार हा तरुण गोळप रत्नागिरी येतील असल्याची माहिती पुढे आली आहे.

या जखमी तरुणावर कोकण रेल्वेच्या पथकाने तात्काळ प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म वर कार्यरत दोन आर पी एफ व विक्रेत्याने समयसूचकता दाखवत केलेल्या हालचालीमुळेच त्या तरुणाचे प्राण वाचले. या घटनेची दखल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी तिघांचे ही विशेष कौतुक केले आहे. संतोष कुमार झा यांनी या तिघांना ही प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अवॉर्ड जाहीर करून ते तात्काळ त्यांना प्रदान करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT