रत्नागिरी

Ratnagiri politics | कोकण विधान परिषद निवडणुकित अनिकेत तटकरे बिनविरोध

अपक्ष उमेदवारानीही ही शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतले

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकण विधान परिषद निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उबाठा गटाचे उमेदवार सुरेंद्र तथा बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उमेदवार बाळ माने म्हणाले की, निवडणुकीचा घोडेबाजार आणि मतदारांची आकडेवारी पाहता महाविकास आघाडीला यश मिळणे दूर वाटते. त्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत सुनिल तटकरे बिनविरोध झाली आहे. अपक्ष उमेदवारानीही ही शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT