बैलांच्या झुंजी 
रत्नागिरी

Ratnagiri News| पिंगुळीत बैलांच्या झुंजीवर पोलिसांची धडक कारवाई

पाचजणांवर गुन्हा; दोन बैलांसह दोन टेम्पो जप्त

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : पिंगुळी-गोंधळपूर मुस्लिमवाडी मैदानावर बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्याचा प्रकार ६ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. गोपनीय माहितीच्या आधारे कुडाळ पोलिसांनी या ठिकाणी धडक कारवाई करत झुंजीसाठी आणलेले दोन बैल ताब्यात घेतले. तसेच बैलांच्या वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो मॅक्स आणि पिकअप टेम्पो जप्त करण्यात आली. याप्रकरणी एकूण पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

६ नोव्हेंबर रोजी स. ६.३०च्या सुमारास गोंधळपूर मुस्लिमवाडी येथील मैदानावर बैलांच्या झुंजी सुरू असल्याची गोपनीय माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी गेले असता मैदानावर बैलांची झुंज सुरू असल्याचे निदर्शनास आले. मात्र, पोलिस आल्याचे समजताच मैदानावर जमलेल्या गर्दीतील अनेकांनी पळ काढला.

सहा. पोलिस निरीक्षक कोळेकर यांनी पिंगुळी-गोंधळपूरचे पोलिस पाटील शंकर सातार्डेकर यांना घटनास्थळी बोलावून घेतले. चौकशीदरम्यान या बैल झुंजीचे बैल गुलाब अब्दुल लतीफ शेख (रा. पिंगुळी-मुस्लिमवाडी) यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी आणण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी ही बैलांची झुंज थांबवून दोन्ही बैलांना सुरक्षित बांधून ठेवले. यावेळी सुभाष मनोहर खाडे (४७, रा. टेंबे खाडेवाडी, जि. रत्नागिरी) यांनी सफेद रंगाचा बैल आपल्या मालकीचा असल्याचे सांगितले. गुलाब अब्दुल लतीफ शेख, सुभाष मनोहर खाडे, मुन्ना मुजावर आणि टेम्पोचालक सर्वेश सुरेश भातडे (रा. रत्नागिरी) व अन्य एक टेम्पो चालक यांनी संगनमताने बैलांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना न घेता बोलेरो मॅक्स व पिकअप टेम्पोमधून बैल मैदानावर आणले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT