पोलिस संरक्षणात होणार पेट्रोल, गॅस सिलिंडर वाहतूक -
रत्नागिरी

Ratnagiri News : पोलिस संरक्षणात होणार पेट्रोल, गॅस सिलिंडर वाहतूक

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जिल्ह्यासाठी पुढील दोन महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. इंधन पुरवठा करणाऱ्या वाहनांना आवश्यकतेनुसार पोलिस संरक्षण पुरवण्याचे निर्देश पेोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

या आदेशानुसार पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर वाहून नेणारी अधिकृत वाहने ही अत्यावश्यक सेवेत मोडतात. त्यांच्या वाहतुकीत अडथळा आणणे, मार्ग रोखणे किंवा चालकांना धाक दाखवणे यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कलमान्वये कठोर कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवरून इंधन पुरवठा करणाऱ्या वाहनांना मुक्त संचाराचा अधिकार राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT