दुसऱ्या दिवशी 695 उमेदवारांची मैदानी चाचणी 
रत्नागिरी

Ratnagiri News : दुसऱ्या दिवशी 695 उमेदवारांची मैदानी चाचणी

भरतीसाठी 764 उमेदवार हजर

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा पोलिस भरतीच्या दुसऱ्या दिवशी एकूण 1103 उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी पोलिस दलाकडून बोलावण्यात आले होते. त्यातील 764 उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी हजर होते. त्यातील 69 उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अपात्र ठरले. त्यामुळे 695 उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली तर तब्बल 339 उमेदवार या भरतीसाठी गैरहजर राहिले.

शिपाई आणि चालक शिपाईच्या 108 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 5.30 वा.पासून मिरजोळे एमआयडीसी येथील क्रिडा संकुलात या भरती प्रक्रियेला सुरुवात होते. यावेळी प्रथम मैदानी चाचणी घेण्यात येत असून दुसऱ्या दिवशी एकूण 1103 उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी केवळ 764 उमेदवारच भरतीच्या ठिकाणी हजर होते. त्यातील 69 उमेदवार पोलिस भरतीच्या नियमात बसत नसल्याने अपात्र ठरवण्यात आले. उर्वरित 695 उमेदवारांची 1600 मिटर धावणे, 100 मिटर धावणे आणि गोळाफेक या तीन प्रकारच्या मैदानी चाचण्या घेण्यात आल्या.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर,लांजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम, शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव आणि एलसीबीची पोलिस निरीक्षक नितिन ढेरेेंसह पोलिस कर्मचारी पोलिस भरतीवर लक्ष ठेवून होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT