Pavitra Portal Teacher Recruitment Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri News| पवित्र पोर्टलमधील २२४ उमेदवारांच्या कागदपत्रांची आज पडताळणी

मराठी, उर्दू माध्यमातील शिक्षकांना मिळणार संधी; पात्र उमेदवारांना समुपदेशनानंतर नियुक्तीपत्र

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्‍नागिरी जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमधील गणित, विज्ञान विषयांच्‍या शिक्षकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यातील २२४ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी आज सोमवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत जिल्हा परिषदेच्‍या कै. शामराव पेजे सभागृहात सुरू होणार आहे. या प्रक्रियेत मराठीचे २१४ आणि उर्दू माध्यमातील ८ उमेदवारांचा समावेश असून कागदपत्रे पडताळणीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार १७ शिक्षकांची पदे रिक्त असून त्यामध्ये प्राथमिक शिक्षकांसह सुमारे ४७० पदवीधर शिक्षकांच्या पदांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील भरतीमध्ये ४५७ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली होती. यामध्ये इंग्रजी आणि गणित विषयाच्या सुमारे २५० पदवीधर शिक्षकांचा समावेश होता. आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेला वेग आला आहे.

पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवारी होणार आहे. एका दिवसात कादपत्रांची पडताळणी होईल. पडताळणी पूर्ण होताच पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे शाळा वाटप करून नियुक्‍तीपत्रे दिली जाणार आहेत. नोव्‍हेंबर अखेरपर्यंत सर्व शिक्षक शाळांवर रूजू होण्याची शक्‍यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT