रत्नागिरी ः प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या अंशकालीन महिला परिचरांना 1 जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. याबाबत जि. प. महिला परिचर महासंघातर्फे प्रशासनाला सोमवारी निवेदन देण्यात आले आहे.
गेले 5 वर्षे जि. प. च्या अंशकालीन महिला परिचर या आंदोलन करीत आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. शेवटी 1 जुलैपासून त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सोमवारी त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन दिले आहे. यावेळी संघटनेच्या आकांशा कांबळे, सुप्रिया पवार, अश्विनी घडशी, मेघा राणे, मनीषा जाधव, प्रज्ञा अनसूरकर आदी उपस्थित होत्या. अंशकालीन या नावात बदल करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला परिचरांमधून थेट घेण्यात यावे, वेतन 21 हजार देण्यात यावे आदी या अंशकालीन परिचरांच्या मागण्या आहेत. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात 350 अंशकालीन महिला? ? परिचर आहेत.