Illicit Liquor Raid 
रत्नागिरी

Ratnagiri News : जिल्ह्यात हातभट्टी दारूच्‍या उच्चाटनासाठी विशेष मोहीम

धडक कारवाईत ३८ गुन्हे नोंद; ३० संशयित आरोपींना अटक

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुणे जिल्ह्यात हातभट्टीच्या विषारी दारुमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विशेष दक्षता घेण्यात येत असून, त्यानुसार २८ मेपासून जिल्ह्यातील हातभट्टी दारुचे उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेत २८ मेपासून अद्यापपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यात निदर्शनास आलेल्या हातभट्टी दारु निर्मिती व विक्री ठिकाणांवर कारवाई करुन एकूण ३८ गुन्हे नोंद करण्यात आले असून ३० संशयित आरोपींना अटक केली आहे.

या दाखल गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु १.६४० लिटर, गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्य १७.६४ बल्क लिटर, रसायन २३,४०० लिटर तसेच मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या १ वाहनासह एकूण रुपये ११ लाख ६६ हजार ५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाकडून अवैध मद्याविरुध्दची कारवाई यापुढेही सुरुच राहील. जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारुची निर्मित्ती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्सॲप क्रमांक-८४२२००११३३ व टोल फ्री क्रमांक- १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाकडून करण्यात येत आहे. अवैध मद्यासंदर्भात बातमी किंवा खबर देणाऱ्या व्यक्‍तीचे नाव या पोलिस विभागाकडून गुप्त ठेवण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT