‘महावितरण’ Pudhari file Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणा देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण

ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा महावितरणचा दावा

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : पावसाळ्यामध्ये महावितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी पावसाळ्यात वीज पुरवठ्यातील बिघाड कमीतकमी होईल या दृष्टीने नियोजन करून मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणा देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आलेली आहेत.

महावितरणकडून रत्नागिरी जिल्ह्यात प्राधान्यक्रमानुसार वीज वाहिन्यांची व वीज उपकरणांची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. त्यात उपरी वीज वाहिन्यांना स्पर्श करत असणाऱ्या फांद्या तोडणे, तुटलेले पिन आणि डिस्क इन्सुलेटर बदलणे, स्टे वायरमध्ये स्टे इन्सुलेटर तपासणे व दुरुस्त करणे, वाहिन्यांचे जळालेले वा खराब झालेले जंपर बदली करणे, वाकलेले वा गंजलेले पोल बदली करणे, उंचीबाबतचे निकष न अनुसरलेल्या सैल झालेल्या तारा ओढणे, लघुदाब वाहिनीवर पीव्हीसी स्पेसर्स बसविणे, उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांना गार्डिंग पुरविणे, रस्त्यालगतच्या व रस्ता क्रॉस करणाऱ्या वाहिन्यांच्या गार्डींगची तपासणी करणे व त्याचा योग्य तो ताण ठेवणे, उच्चदाब व लघुदाब खांबाचे पुर्ण अर्थिंग तपासणे तसेच आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे, वितरण रोहित्रांचे पुर्ण अर्थिंग तपासणे आणि तुटलेल्या अर्थवायर पुर्ववत करणे, रोहित्र वितरण पेटींची जळालेली केबल बदली करणे, रोहित्र वितरण पेटीस अर्थिंग करणे, रोहित्राच्या तेलाची गळतीची तपासणी करणे, रोहित्राच्या ब्रीदरमधील सिलीका जेल बदली करणे.

रोहित्र व वाहिन्यांचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, लघुदाब वितरण पेटीची किरकोळ दुरुस्ती करणे व दरवाजा नसल्यास लावणे, भूमीगत वीज वाहिन्यांचे तात्पुरते असलेले जॉइंट कायमस्वरुपी करणे, उच्चदाब व लघुदाब फीडर पीलरचे पुर्ण अर्थिंग तपासणे तसेच आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे, जळालेल्या वा तुटलेल्या सर्व्हिस वायर बदली करणे.

नादुरुस्त उच्चदाब वाहिनी दुरुस्त व बदली करणे, निकामी वा तुटलेले वीज खांब बदली करणे, उपकेंद्रांची अर्थिंग तपासणी करणे, उपकेंद्रांमधील वाढलेले गवत काढणे व स्वच्छता करणे, उपकेंद्रांतील लाइटिंग अरेस्टरची तपासणी करणे व नादुरुस्त असल्यास नवीन लावणे. उपकेंद्रांतील बॅटरींची स्थिती तपासणी करणे व मेंटेनन्स करणे, उपकेंद्रातील आयसोलेटर अलाइनमेंट तपासणे व दुरुस्त करणे, पीलरचे अर्थिंग तपासणे व दुरुस्ती करणे, जळालेल्या वा तुटलेल्या केबल बदली वा दुरुस्ती करणे, परिस्थितीनुसार आवश्यक असलेली इतर कामे सर्व वाहिन्यांचे, उपकेंद्रांचे, रोहित्रांचे मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत.

आपालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी रोहित्र ऑईल, वीज खांब, इन्सुलेटर इ. उपलब्ध ठेवण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्याकरीता क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दक्षराहणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक ७८७५७६५०१८ हा असून नागरिकांना आपात्‍कालीन स्थितीत या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT