Ratnagiri Weather Update 
रत्नागिरी

Ratnagiri News : जिल्‍ह्यात पाऊस थांबला; उकाडा वाढला!

घामाने रत्‍नागिरीकर हैराण; दिवसा कडक ऊन, रात्री वादळी वारा

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : रत्‍नागिरी जिल्‍ह्यात जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात दमदार पाऊस झाला आहे. त्‍यानंतर पावसाने चांगलीच दडी मारली आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्यात प्रचंड उकाडा वाढला असून घामाने रत्‍नागिरीकर हैराण झाले आहेत. पावसाने उसंत घेतल्‍यामुळे भात पिके पिवळी पडू लागली आहेत. काहीठिकाणी भात लावणी थांबली आहे. त्‍यामुळे आता भात लावणी तातडीने करणे अत्‍यावश्‍यक बनले आहे. त्‍यामुळे शेतकरी पुन्‍हा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

जून महिन्‍यात तीन ते चार दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्‍यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले. जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या सात दिवसात पावसाने जिल्‍ह्याला झोडपून काढले. त्‍यामुळे नदी, धरणातील पाणी पातळी वाढली आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांकडून खरीप पेरण्याकरून पाच हजारहून अधिक हेक्‍टरवर भात लावणी केली. मात्र काही दिवसापासून पावसाने उसंती घेतली आहे. त्‍यामुळे शेतकरी पुन्‍हा चिंताग्रस्‍त झाला आहे. भात लावणीसाठी पावसाची गरज आहे. काहीठिकाणी बोअरचे पाणी टाकून भात लावणीचे काम सुरू आहे. त्‍यामुळे शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. पुढील आठवड्यापासून पाऊस सक्रिय होण्याची शक्‍यता असल्‍याचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे.

मागील काही दिवसात दोन टक्केच पाऊस

रत्‍नागिरी जिल्‍ह्यात मागील चार ते पाच दिवसात पाऊस कमी झालेला असून पावसाने विश्रांतीच घेतली आहे. राजापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्‍यात शून्‍य! १० ते ४० टक्‍क्‍यांवर पाऊस पडला आहे. एक किंवा दोन टक्केच पाऊस झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT