जलजीवन मिशन प्रशिक्षणाचा निधी लाटल्याचा आरोप pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri News : निधीअभावी जलजीवन मिशनची ८१९ कामे पूर्णपणे ठप्प

निधी न मिळाल्‍यामुळे ठेकेदारांनी कामे थांबवली; जिल्‍ह्यातील ५९३ योजनांची कामे झाली पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्‍ह्यात १ हजार ४२८ कामे मंजूर असून त्‍यापैकी ५९३ कामे पूर्ण झाली आहेत. मात्र निधी अभावी तब्‍बल ८१९ योजनांची कामांना मागील सहा महिन्‍यांपासून पूर्णपणे ब्रेक लागला आहे. कामे सुरू करण्यासाठी १०० कोटींहून अधिक निधी गरज आहे. त्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाकडून प्रस्‍ताव पाठवला आहे, तर दुसरीकडे निधी न मिळाल्‍यामुळे ठेकेदारांनी कामे थांबवली असून निधीसाठी आंदोलनही सुरू केले आहे. ऐन उन्‍हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे.

केंद्र शासनाच्‍या महत्‍वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्‍येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र निधीअभावी जिल्‍ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजनांची कामे अर्धवट असून अनेक कामे बंदच झाली आहेत. जिल्‍ह्यातील 1428 कामांसाठी 1167.73 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 44 योजनांचे 25 टक्‍के कामे झाली आहेत, तर 122 योजनांचे 25 ते 50 टक्‍के, 304 योजनांचे 50 ते 75 टक्‍के, 349 योजनांचे 75 ते 100 टक्‍के कामे झाली आहेत. एकूण 593 कामेपूर्ण झाली असून त्‍यापैकी 250 हून अधिक कामे हस्‍तांतरीत करण्यात आली आहेत.

जिल्‍ह्यात विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची पाईपलाईन टाकणे, जलशुध्दीकरण केंद्र उभारणी, पाण्याच्‍या टाक्‍या बांधकाम तसेच घरगुती नळजोडणीची कामे सुरू होती. मात्र मागील काही महिन्‍यांपासून निधी नसल्‍यामुळ सर्वच कामे ठप्‍प झाली आहेत. जिल्‍हा परिषद प्रशासनाने शासनाकडे निधीची मागणी केली असली तरी त्‍याचा पाठपुरावा प्रभावीपणे होत नसल्‍याची टीका होत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे ही अक्षम्‍य दुर्लक्ष होत असल्‍याचे तक्रारी नागरिक, जि. प. सदस्‍य करीत आहेत. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत जलजीवनच्‍या कामांवर, झालेल्‍या खर्चावर मोठा गोंधळ होण्याची शक्‍यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT