girl assault  file photo
रत्नागिरी

Ratnagiri news | विद्यार्थिनींसमोर अश्लील चाळे; सरकारी कर्मचारी ताब्यात

संशयित देवरूख पं. स.चा लिपिक

पुढारी वृत्तसेवा

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील मठधामापूर परिसरातून संगणक वर्गासाठी जाणाऱ्या ४ अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी देवरूख पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित हर्षल सुभाष गवंडी (२६, रा. पाटगाव) याला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे संशयित हा संगमेश्वर पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

१ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते १० च्या सुमारास ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनी देवरूख येथील संगणक वर्ग संपवून बसने ताम्हाणे फाटा येथे उतरल्या होत्या. तेथून त्या पायी मठधामापूर गुरववाडीकडे जात असताना, पिवळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांचा पाठलाग सुरू केला.

मठधामापूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ त्याने दुचाकी थांबवून आधी विद्यार्थिनींची टेहळणी केली. त्यानंतर काही अंतरावर पुन्हा विद्यार्थिनींच्या जवळ जाऊन चालत्या दुचाकीवर उभे राहून अश्लील कृत्य केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत संशयित घटनास्थळावरून पसार झाला होता. पालकांनी धीर देत २ एप्रिल रोजी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिस निरीक्षक उदय झावरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT