सोमवारपासून जादा वाहतूक थांबवणार 
रत्नागिरी

Ratnagiri News : सोमवारपासून जादा वाहतूक थांबवणार

रत्‍नागिरी आगार प्रमुख प्रशांत खरे यांची माहिती; शाळांच्या फेरीसाठी एसटी विभागाचे नियोजन सुरू

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : शाळा, महाविद्यालयांना सुट्टी लागल्‍यामुळे, उन्‍हाळी वाहतुकीसाठी जादा वाहतुकीसाठी मुंबई, पुणे, बोरिवलीसह इतर ठिकाणी गाड्या सोडल्‍या होत्‍या. सोमवारपासून जादा वाहतूक थांबवण्यात येणार असून ग्रामीण वाहतुकीसाठी या गाड्या वापरल्‍या जातील, अशी माहिती रत्‍नागिरी आगारप्रमुख प्रशांत खरे यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना शनिवारी दिली.

रत्‍नागिरी विभागाच्‍या वतीने शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष गाड्या सोडल्‍या जातात. दरम्‍यान, शाळा, महाविद्यालयांचे परीक्षा संपून सुट्ट्या लागल्‍यामुळे रत्‍नागिरी आगाराच्‍या वतीने यामार्गावरील फेऱ्या रद्द करून उन्‍हाळी वाहतुकीसाठी गाड्या सोडण्यात आल्‍या. मुंबई, पुणे, बोरिवली, तूळजापूर, कोल्‍हापूर, लातूरसह इतर ठिकाणी एसटी बसेस धावल्‍या. दरम्‍यान येत्‍या 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वीच रत्‍नागिरी आगाराच्‍या वतीने नियोजन सुरू करण्यात आले आहे. सोमवारपासून जादा वाहतूक बससेवा बंद करण्यात येणार आहेत. त्‍यासर्व बसेस ग्रामीण वाहतुकीसाठी वळवण्यात येणार असल्‍याचे खरे यांनी सांगितले.

बंद असलेल्‍या ठिकाणची बससेवा सुरू करणार

रत्‍नागिरीतील विशेषता ग्रामीण भागात विविध भागात बससेवा बंद असल्‍याच्‍या तक्रारी रत्‍नागिरी आगारात प्राप्‍त झाल्‍या आहेत. याची माहिती घेण्यात आली आहे. यासंदर्भात आज सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे.प्रवाशांच्‍या सोयीसाठी ज्‍या ज्‍याठिकाणी बस सेवा बंद होती. त्‍याठिकाणी बससेवा सुरू करण्यात येणार असल्‍याचे खरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT