मुरादपूर-अमेय पार्क मार्गावर सिमेंट ब्लॉक बसविण्यास प्रारंभ 
रत्नागिरी

Ratnagiri News : मुरादपूर-अमेय पार्क मार्गावर सिमेंट ब्लॉक बसविण्यास प्रारंभ

ठाकरे शिवसेनेच्‍या पाठपुराव्‍याला आलेय यश

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण शहर शाखेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. शहरातील मुरादपूर येथील गणपती मंदिर ते अमेय पार्क मार्गावरील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास रविवारी (दि.३१) प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

हा रस्ता अनेक महिन्यांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. या प्रश्नाबाबत ठाकरे शिवसेना चिपळूणच्या वतीने २९ एप्रिल रोजी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर १९ मे रोजी पुन्हा नगरपरिषदेत धडक देत या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात आला होता. यावेळी नगरपरिषद प्रशासनाने संबंधित रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सध्या निधी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र, पावसाळा तोंडावर आलेला असताना नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी शिवसेनेने पर्यायी उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात सिमेंट ब्लॉक बसविण्याची मागणी लावून धरली होती. या मागणीसाठी विभाग प्रमुख रविराज ऊर्फ बापू चिपळूणकर यांनी पाठपुरावा केला.

या कामाच्या शुभारंभप्रसंगी शहर प्रमुख सचिन ऊर्फ भैया कदम, उपशहर प्रमुख संजय रेडीज, उपशहर प्रमुख मनोज पांचाळ, युवा सेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, विभाग प्रमुख रविराज उर्फ बापू चिपळूणकर, नगरसेवक संजय गोताड, वैशाली निमकर तसेच नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी रवी सातपुते यांच्‍यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT