शिळ धरणातील पाणीसाठा ०.४८७ द.ल.घ.मी.पर्यंत वाढला 
रत्नागिरी

Ratnagiri News : एक दिवस आड पाणीपुरवठा संकट टळले

शिळ धरणातील पाणीसाठा ०.४८७ द.ल.घ.मी.पर्यंत वाढला; रत्‍ना‍गिरीकरांत समाधान

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : सोमवारी पडलेल्या पावसाने रत्‍नागिरीकरांवर कृपा केली आहे. रत्‍नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील पाणीसाठा समाधानकारक वाढला आहे. या धरणातील पाणीसाठा आता ०.४८७ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. त्‍यामुळे एक दिवस आड पाणी पुरवठ्याचे संकट टळले आहे. आठवडाभरापुर्वी शिळ धरणातील पाणीसाठा ०.५८ दशलक्ष घनमीटर इतका राहिला होता. त्‍यामुळे ११ जूनपासून १ दिवस आड पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले होते.

रत्‍नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणाची पाणी साठवण क्षमता ३.३३६ द.ल.घ.मी इतकी आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे पाउस लांबण्याचा हवामान विभागाचा अंदाज होता. त्‍याचबरोबर वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन मोठया प्रमाणात होत होते. पाणी पुरवठा समीती सभापती निमेश नायर शहरवासियांना पाणीपुरवठा पुरेसा व्हावा यासाठी धरणावर जावून आवश्यक माहिती घेत होते. खबरदारीचा उपाय म्हणून १५ दिवसांपूर्वी दर सोमवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले.

आठवडाभरापूर्वी धरणातील पाणीसाठा ०.५८ दशलक्ष घनमीटरवर आल्यानंतर आणि पाउस पडण्याची चिन्हे दिसत नसल्याने ११ जूनपासून १ दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घण्यात आला. परंतू सोमवारी पडलेल्या जोरदार पावसाने धरणातील पाणीसाठा समाधानकारक पातळीपर्यंत वाढला. धरणातील पाण्याची पातळी २ इंचाने वाढून पाणीसाठा ०.४८७ दशलक्ष घनमीटर इतका वाढला. आता पावसाळा सक्रिय झाला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर १ दिवस आड पाणीपुरवठयाचे करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

रत्‍नागिरी शहरवासीयांना दरवर्षी एप्रिल महिन्यापासूनच पाणीकपातीचा सामना करावा लागत होता. यावर्षी मे महिन्यात आठवडयातून १ दिवस पाणी पुरवठा म्हणजेच दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येवू लागला. सभापती निमेश नायर यांनी वेळोवेळी धरणावर भेट देवून आवश्यक असणारी माहिती घेवून त्‍यानुसार आवश्यक कार्यवाही केली. त्‍यामुळे कडक उन्हाळयातही पाण्याची टंचाई जाणवली नाही. आता पावसानेही कृपा केली असल्याने १ दिवस आड पाणीपुरवठ्याचे संकटही टळले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT