कलाकारांचे १४५ प्रस्‍ताव तीन महिन्‍यांपासून धूळखात  
रत्नागिरी

Ratnagiri News : कलाकारांचे १४५ प्रस्‍ताव तीन महिन्‍यांपासून धूळखात

जिल्‍ह्यात दरवर्षी १०० कलावंतांची योजनेसाठी होतेय निवड; मिळतात ५ हजार रूपये

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : जिल्‍ह्यातील कलावतांची उतरत्‍या वयात उपासमार होऊ नये म्‍हणून शासनाकडून राजर्षी शाहू महाराज ज्‍येष्ठ साहित्‍यिक कलावंत मानधन योजना राबवली जाते. जिल्‍हा परिषदेकडून सुमार १४५ प्रस्‍ताव कलावंतांनी सादर केले आहेत. हे प्रस्‍ताव मागील तीन महिन्‍यांपासून मंजुरीविना धूळखात पडून आहेत.

त्‍यामुळे कोणी लक्ष देत का लक्ष, अशी आर्त हाक जिल्‍ह्यातील कलावंत देत आहेत. जिल्‍हास्‍तरीय निवड समितीमार्फत निवडलेल्‍या कलावंतांच्‍या बँक खात्‍यात शासनाकडून थेट मानधन जमा केले जाते. या योजनेसाठी पात्र लाभार्थी दरवर्षी तालुकास्‍तरावर अर्ज सादर करतात. तालुकास्‍तरावरून हे अर्ज आता जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामपंचायत विभागाकडे येतात.

प्राप्‍त अर्जातून पात्र लाभार्थी कलावंतांची निवउ जिल्‍हास्‍तरीय समितीकडून केली जाते. जिल्‍ह्यात दरवर्षी १०० कलावंतांची या योजनेचा लाभ देण्यासाठी निवड केली जाते. २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात जिल्‍ह्यात सुमारे १२५ कलावंतांनी प्रस्‍ताव सादर केले होते. ते प्रस्‍ताव अजूनही मंजूर न झाल्‍याने धुळखात पडून आहेत. त्‍यामुळे वृद्ध कलावंतांच्‍या खात्‍यात अद्याप ५ हजार रुपये जमा झालेले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT