ST Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri MSRTC | रत्नागिरी एसटीतर्फे धार्मिक तीर्थाटनास शुभारंभ

Ratnagiri MSRTC | प्रवाशांना सवलतीत जिल्ह्यातील नऊ आगारांतून धार्मिक पर्यटन करता येणार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी विभागातील रत्नागिरी आगारासह ८ आगारात प्रवासी, भाविकांसाठी खास धार्मिक, पर्यटन सहलीसाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. अष्टविनायक दर्शन, महाबळेश्वर, तुळजापूर, अक्कलकोट याठिकाणी धार्मिक पर्यटन होणार आहे. त्यासाठी टूर पॅकेजचे दर जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनो सवलतीच्या दरात धार्मिक पर्यटन करता येणार आहे.

सध्या उन्हाळी हंगाम सुरू असून प्रवासी मोठ्या प्रमाणात धार्मिक, पर्यटनासाठी बाहेर पडत असतात. याचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे पॅकेज टूर्स संकल्पना राबवण्यात येत आहे.

जिल्ह्यातील प्रवाशांना अष्टविनायक दर्शन तसेच महाबळेश्वर, वाई, पाचगणी, तुळजापूर, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, शनिशिंगणापूर, शिर्डी तसेच पर्यटनस्थांनां सवलतीच्या दरात भेटी देता येणार आहे. रत्नागिरी विभागांतर्गत नऊ आगारांना पॅकेज टूर्स याबाबत सूचना करत तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ७५ वर्षांपुढील ज्येष्ठांना मोफत, तर ६५ वर्षांपुढील नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी या तीर्थाटनाचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले. रत्नागिरीसह विविध आगारातून ग्रुपने बुकींग केल्यास स्वतंत्र बस देण्यात येणार आहे. ३५ ते ४० प्रवाशांचा गट एकत्र आल्यास मागणीनुसार त्यांना बस देण्यात येईल.

असे आहेत दर

अष्टविनायक - प्रौढांसाठी २२५३ रुपये, तर महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी ११२२ रुपये, वाई, पाचगणी, महाबळेश्वर दर्शन - प्रौढांसाठी १११३ रुपये, महिला, ज्ये. ना. ५६१ रुपये, तुळजापूर, तुळजाभवानी माता दर्शन-प्रौढांसाठी १६६१ रुपये, तर महिला, ज्येष्ठ ना. ८३७रुपये, अक्कलकोट-प्रौढांसाठी ६६१, महिला, ज्ये. ना. ८३७ रुपये.

एसटी महामंडळाच्या वतीने धार्मिक पर्यटनासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी विभागातील सर्वच आगारात याची सोय असून सवलतीच्या दरात धार्मिक, सहलीचा आनंद घेता येणार आहे. या उपक्रमांचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा.
बालाजी आडसुळे, आगार व्यवस्थापक, रत्नागिरी आगार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT