दिवाळीसाठी रत्‍नागिरी विभाग सज्ज, ६५० बसेसचे नियोजन 
रत्नागिरी

Ratnagiri News : दिवाळीसाठी रत्‍नागिरी विभाग सज्ज, ६५० बसेसचे नियोजन

गुरुवारपासून धावणार एसटी बसेसस; ६ ते १४ नोव्‍हेंबर दरम्‍यान एसटीचे विशेष नियोजन

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : दिवाळी सण काहीच दिवसांवर येवून ठेपला असून दिवाळीसाठी रत्‍नागिरी विभागाच्‍या वतीने तब्‍बल ६५० एसटी बसेसचे नियोजन केले आहे. ६ नोव्‍हेंबरपासून एसटी बसेस पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुणे येथे बसेस धावणार आहेत. यानिमित्त दिवाळीसाठी रत्‍नागिरी विभाग सज्‍ज झाला आहे.

नोकरीनिमित्त इतर जिल्‍ह्यातील चाकरमानी कोकणातील रत्‍नागिरी जिल्‍ह्यात आले आहेत. दिवाळीसणानिमित्त प्रत्‍येकजण आपल्‍या मूळ गावी हमखास जातोच. येत्‍या ५ नोव्‍हेंबरपासून शाळा-महाविद्यालयांना दिवाळीच्‍या सुट्ट्या सुरू होणार आहेत. काहीजण आपल्‍या मूळगावी, पर्यटनाला, तर कामानिमित्त आपल्‍या गावी जाण्यासाठी प्रवासी आपल्‍या हक्‍काच्‍या लालपरीलाच पसंती देत असतो. त्‍यामुळे रत्‍नागिरी विभागाच्‍या वतीने दररोज ३० बसेस सोडण्यात येणार आहे. जिल्‍ह्यातील चाकरमानी, प्रवाशांनी आताच तिकीट आरक्षण करून घ्यावे असेही आवाहन एसटी विभागाने केले आहे.

पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुण्यात धावणार बसेस मुंबई, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्‍हापूर, सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव, बीड, विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा या जिल्‍ह्यात दिवाळीसाठी गाड्या धावणार आहेत.

सवलत मिळणार, एनसीएमसी कार्ड बंधनकारक

दिवाळीनिमित्त तरुणी, महिला, ६५ वर्षांवरील ज्‍येष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्‍के सवलत, ७५ वर्षांपुढील ज्‍येष्ठांना शंभर टक्‍के सवलत असून मोफत प्रवास असणार आहे. सवलतधारकांना एनसीएमसी कार्ड बंधनकारक असणार असून प्रवाशांनी कार्ड जवळ बाळगावे, रिचार्ज करून ठेवावे. कार्ड नसल्‍यास पूर्ण तिकीट द्यावे लागणार आहे.

रत्‍नागिरी आगारातून तुळजापूर, पंढरपूर, सोलापूरसह इतर ठिकाणी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. रत्‍नागिरी आगाराच्‍यावतीने नियोजन झाले आहे.
-बालाजी आडसुळे, रत्‍नागिरी आगार, रत्‍नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT