खरवतेत साकारतेय आधुनिक क्रीडांगण 
रत्नागिरी

Ratnagiri : खरवतेत साकारतेय आधुनिक क्रीडांगण

आ. शेखर निकम यांचे प्रयत्न यशस्वी; तब्बल तेरा एकर क्षेत्रात होतेय उभारणी

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण: सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे व आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून खरवते कृषी महाविद्यालयाच्या परिसरात 13 एकर जागेत आधुनिक क्रीडांगणाची उभारणी सुरू आहे. या क्रीडांगणामुळे ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना प्राविण्य सिद्ध करण्यासाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

या क्रीडांगणात अत्याधुनिक इंडोर स्टेडियम, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 4 क्रिकेट विकेट्स व मैदान, आधुनिक बास्केटबॉल कोर्ट, सुव्यवस्थित व्हॉलीबॉल मैदान, बंदिस्त कबड्डी मैदान तसेच सेमी ऑलिंपिक साईजचा जलतरण तलाव उभारला जात आहे. लवकरच या सुविधा उपलब्ध होत असल्याने ग्रामीण तरुणाईला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी मिळणार आहे. या क्रीडांगणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि आमदार शेखर निकम यांच्या पुढाकारामुळे खरवते हे गाव क्रीडाक्षेत्रातील नवा प्रेरणादायी केंद्रबिंदू ठरणार असून, या उपक्रमामुळे खेळाडूंमध्ये चालना मिळणार आहे.

खरवते येथे आकार घेत असलेल्या आधुनिक क्रीडांगणसाठी खर्च खूप मोठा आहे. क्रिकेटचा ग्राऊंड बनवण्यासाठी तब्बल तीस लाखांचा खर्च आला आहे. हे क्रीडांगण तयार झाले आहे. लवकरच त्यावर स्पर्धा घेतल्या जातील.
सुनित कुमार पाटील, प्राचार्य, खरवते कृषी कॉलेज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT