मोबाईल चोरी pudhari File photo
रत्नागिरी

Ratnagiri Crime : संगमेश्वर एसटी स्थानकात ६४ हजारांचा मोबाईल चोरीला

संगमेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

संगमेश्वर : संगमेश्वर एसटी स्थानक परिसरात फिर्यादी यांचा सुमारे ६४ हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेषिम दिनकर साटम (५४, सध्या रा. बोरिवली, मुंबई) हे ९ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता मुंबईतूून रत्नागिरीकडे येण्यासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान १० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर एसटी स्थानक परिसरात असताना त्यांचा मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी शोध घेतला असता मोबाईल मिळून आला नाही. अज्ञात व्यक्तीने लबाडीच्या उद्देशाने मोबाईल चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे.

चोरीस गेलेल्या मोबाईलमध्ये ॲपल कंपनीचा निळ्या रंगाचा आयफोन १५ असून, त्याची किंमत सुमारे ६४ हजार रुपये आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT