चिपळूण ः लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील आंदोलनकर्त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेतली. 
रत्नागिरी

Ratnagiri protest : लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील आंदोलनास मनसेचीही साथ मिळणार

आंदोलनकर्त्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; 65 दिवसांपासून सुरू आहे आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनदरम्यान कंपनी विरोधातील लोटे औद्योगिक परिसरात व मच्छीमार बांधवांमध्ये वातावरण संतप्त होण्यास सुरुवात झाली आहे. 6 एप्रिल रोजी होणाऱ्या महामोर्चाच्या तयारीमध्ये मनसेने देखील साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगितले जात आहे. त्यानुसार समितीमधील प्रमुख आंदोलनकर्त्यांनी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीत पीफास या घातक रसायनाचे उत्पादन करण्यात येत असल्याचा संशय लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीवर व्यक्त करत गेले 65 दिवसांहून अधिक काळ कंपनी प्रवेशद्वारासमोर या विरोधात व कंपनी बंद करण्यासंदर्भात धरणे आंदोलन सुरू आहे तर 6 एप्रिल रोजी कंपनीविरोधात लोटे औद्योगिक वसाहत परिसरातील ग्रामस्थांसह स्वयंसेवी, पर्यावरणप्रेमी संस्थांच्या माध्यमतूान तसेच सातगांव मच्छीमार भोई समाजाच्या माध्यमातून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

कंपनीने आपली बाजू पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडल्यानंतर आंदोलनकर्त्यांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी विविध संघटनांसह राजकीय पाठबळ मिळावे यासाठी आंदेोलनकर्त्यांच्या समितीने संबंधित नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांची समितीच्या प्रमुखांनी भेट घेतली. सोमवारी होणाऱ्या मोर्चाला सक्रिय पाठिंबा देण्याचे संकेत ठाकरे यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या मोर्चात मनसेदेखील सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT