मिरकरवाडा जेटीवर मच्छी खरेदीवरून सप्लायरवर हल्ला 
रत्नागिरी

Ratnagiri Crime : मिरकरवाडा जेटीवर मच्छी खरेदीवरून सप्लायरवर हल्ला

लोखंडी फाईटने मारहाण; चाकू उगारल्याने कपाळाला दुखापत

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरावर मच्छी खरेदी केल्याच्या कारणावरून मच्छी सप्लायरला दोघांनी लोखंडी फाईटने मारहाण करून चाकूने वार केल्याची घटना शनिवारी २ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. आरोपी व फिर्यादी मासळी पुरवठादार असून त्याच्या खरेदीविक्रीतील आर्थिक व्यवहारावरून ही मारहाण झाली आहे. जखमी रज्जाक साब यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरकरवाडा बंदरावर रज्जाक हमजा साब (४३, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) हे मच्छी खरेदी करीत असताना शफिक महम्मद शरीफ दर्वे (४५) आणि अब्दुल्ला शफिक दर्वे (२२, दोघे रा. मिरकरवाडा) तेथे आले. ‘तुला सांगितले होते ना, मिरकरवाडा येथे मच्छी खरेदी करण्याची डेरिंग कशी केलीस, तुझी मर्डर करतो,’ अशी धमकी देत शफिक याने रज्जाक यांना पकडून ठेवले. त्यानंतर अब्दुल्ला याने लोखंडी फाईटने त्यांच्या डोक्यात, चेहऱ्यावर, छातीवर व पाठीवर मारहाण केली.मारहाणीनंतर रज्जाक खाली पडले. त्यावेळी शफिक याने पॅन्टमध्ये लपवलेला चाकू काढून त्यांच्या अंगावर उगारला. रज्जाक यांनी त्याचा हात पकडल्याने चाकू कपाळाला लागून दुखापत झाली. घटनेनंतर साक्षीदार व ग्रामस्थांनी रज्जाक यांची आरोपींच्या तावडीतून सुटका करून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ३५१(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT