Burglary 
रत्नागिरी

Ratnagiri News : मिरजोळेत बंद बंगला फोडून पावणेनऊ लाखांचा ऐवज लंपास

रोख रकमेसह सोन्याच्‍या दागिन्‍यांसह मुद्देमालावर चोरट्यांचा डल्‍ला

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील रेल्वे कॉलनीतील बंद बहार बंगला फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ८ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल लांबवला. घरफोडीची ही घटना १ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते २ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वा. या कालावधीत घडली.

याबाबत शालीनी शंकर गुंजे (वय ५०, मूळ रा. सलगरामड्डी, ता. तुळजापूर, धाराशिव, सध्या रा. बहार रेल्वे कॉलनी एमआयडीसी मिरजोळे, रत्‍नागिरी) यांनी गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यानुसार, फिर्यादी या ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजता आपला बहार बंगला बंद करून वैयक्तिक कारणासाठी जळगाव येथे गेल्या होत्‍या. तेथील त्‍यांचे काम आटोपल्यानंतर २ सप्टेंबर रोजी त्‍या रत्‍नागिरीला येण्यासाठी निघाल्या होत्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT