Accident Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Accident : म्हाप्रळ येथे अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार

शिमगोत्सवास जाण्यापूर्वीच काळाचा घाला; तरुण लांजा तालुक्यातील

पुढारी वृत्तसेवा

मंडणगड : तालुक्यातील आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर म्हाप्रळ बौद्धवाडी येथे 1 मार्च रोजी सकाळी 8 च्या सुमारास ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. साहील विजय बेंद्रे (23, मूळगाव खोचरे, ता. लांजा, सध्या रा. घाटकोपर-मुंबई) असे तरुणाचे नाव आहे. शिमगोत्सव साजरा करण्यासाठी मित्रांसमवेत पांगारी (ता. दापोली) येथे तो जात होता. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा लांजा तालुक्यातील असलेला साहील आपल्या मित्रांसमवेत घाटकोपर येथून दुचाकीवरून दापोली येथे निघाला होता. मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ बौद्धवाडी येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे साहील हा एका बाजूने गाडी चालवत पुढे जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या व मुबंईच्या दिशेने जात असलेल्या प्रवासी ट्रॅव्हल्सची दुचाकीस समोरून जोरदार धडक बसली. या धडकेत दुचाकीवरून प्रवास करीत असलेला साहील गाडीच्या चाकाखाली आला व त्याच्याबरोबर गाडीवर प्रवास करणारा सहप्रवासी मित्र दूर फेकला गेल्याने जखमी झाला. या अपघातात साहील हा जागीच ठार झाला. अपघातानंतर ग्रामीण रुग्णालय भिंगळोली येथे आणण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मंडणगड पोलिस अपघातस्थळी दाखल झाले. अपघातास कारणीभूत वाहन व वाहनचालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पंचनामा व गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT