Accident  
रत्नागिरी

Ratnagiri Accident : मार्चमधील अपघात ठरला जीवघेणा; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल

वाडदे परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

गुहागर : गुहागर तालुक्यातील वाडदे परिसरात भरधाव वेगाने स्कूटर चालवताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तब्बल तीन महिन्यांनंतर शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुहागर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मृत तरुणाचे नाव विरेंद्र सुभाष घाडे (२४, रा. उंबराठ घाडेवाडी, ता. गुहागर, सध्या रा. सांताक्रूझ पूर्व, मुंबई) असे आहे.

७ मार्च रोजी रात्री ९.३० च्या सुमारास विरेंद्र घाडे हा स्कूटर (एमएच-०२-जीएफ-०३७०) घेऊन बोया फाटा ते पिंपर फाटा मार्गावरून जात होता. वाडदे परिसरात पोहोचल्यावर भरधाव वेग, रस्त्याची परिस्थिती आणि वाहनावरील नियंत्रण न राखल्याने त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याचे डोके, कपाळ, नाक तोंडाला गंभीर दुखापत झाली. प्राथमिक उपचारानंतर त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. यानंतर मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, शवविच्छेदन अहवाल ४ जून रोजी प्राप्त झाला. अहवालात डोक्याला झालेल्या गंभीर आघातामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अपघाताची चौकशी पूर्ण करून गुहागर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT