रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे आंबा बागेत पंचनामा करताना कृषी विभागाचे कर्मचारी. 
रत्नागिरी

Ratnagiri - आंबा-काजू नुकसान सर्वेक्षणाला सुरुवात

जिल्ह्यात १५ मेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना; शेतकऱ्यांच्या आंदोलनाची शासनाने घेतली दखल

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी: अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानाचा फटका आंब्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. आंबा-काजू उत्पादकांच्या आंदोलनानंतर जाग आलेल्या सरकारने अल्पशो नुकसान भरपाई जाहीर केली होती. त्याविरोधात १५ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर घडकण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली असल्यामुळे १५ मेपर्यंत आंबा-काजू बागांचे सर्वेक्षण संपवण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत त्यामुळे आता कृषी विभागही अॅक्शनमोडवर आला असून आंबा-काजू बागांमध्ये जाऊन नुकसानीचे सर्वेक्षण कर्मचायांकडून सुरु झाले आहे.

नोव्हेंबर महिन्यापासूनच कोकणातील आंबा-काजू व्यावसायिकांना बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. अवकाळी पाऊस व सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे यावर्षी आंबा २० टक्केही झाला नाही. अगदी कोकण कृषी विद्यापिठानेही त्याबाबतचा अहवाल शासनाला दिला आहे. घोड़ा बहुत आंबा हाती असतानाही अवकाळी पावसाचा खेळ कोकणातील काही भागात सुरु आहे. अगदी सहयाद्रीच्या काही पट्टयात गारांचा पाऊसही झाल्याच्या घटना घडल्या.

बदलते हवामान, त्याचप्रमाणे पिकावर येणारा तुडतुडा, बोगस औषधे, त्यातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणून याचाचत चारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासनाकडे आंबा उत्पादक मुख्यमंत्र्यांच्या गान्हाणे मांडूनही आंबा-कानू उत्पादकांना म्याग मिळत नव्हता, याबाबत अखेर आंबा उत्पादकांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली होती. सिंधुदुर्गमध्ये शेतकऱ्यांना महामार्ग रोखल्यानंतर उपरती झालेल्या शासनाने आंब्यासाठी २२ हजाराची नुकसान भरपाई मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती.

मात्र नुकसान भरपाई जाहीर करनाही कृषी विभागाकडून काहीच हालचाली होत नव्हत्या. रत्नागिरी सिंधुदुर्गतील शेतक-यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण हवजून काढण्यास सुरुवात केली. १५ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर धडकण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले. त्यापध्दतीने शेतकयांची मोर्चेबांधणीही सुरु झाली आहे.

चंगल्यावर धडकणाची तयारी करीत असल्याचे पूरा जाहीर झाल्यामुळे जाग आलेल्या सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. शासनच्या आदेशानंतर सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, महसूल अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष हे आता गावांमधील आंबा-काजू बागांचे पंचनामे करु लागले आहेत. आंब्याचं ९० टक्के आहे नुकसान, तर काजूचं ७० एके नुकसान पात्र शेतक-यांची माहिती जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आंबा आणि काजूचे सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र आहे. हे सर्वेक्षण १५ में पयर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा कृषी विभागाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT