सातबारा फेरफारासाठी लाच घेताना मंडल अधिकारी जाळ्यात File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : सातबारा फेरफारासाठी लाच घेताना मंडल अधिकारी जाळ्यात

एका हॉटेलमध्ये पैसे स्विकारताना लाचलुचपतकडून रंगेहाथ अटक

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : तालुक्यातील महसूल विभागातील एका मंडल अधिकाऱ्याला सातबारा फेरफाराच्या कामासाठी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा एका हॉटेलमध्ये लाचलुचपत विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. त्याला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

तक्रारदाराच्या सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी संबंधित मंडल अधिकाऱ्याने लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर संबंधित पथकाने सापळा रचला. चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस परिसरातील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना संबंधित मंडल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT