साथीदारासह कामवालीने मारला ६ लाखांवर डल्ला file photo
रत्नागिरी

Ratnagiri News : साथीदारासह कामवालीने मारला ६ लाखांवर डल्ला

कळमुंडी येथील हनुमानवाडी परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : तालुक्यातील कळमुंडी येथील हनुमानवाडी परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरातील मोलकरीण व तिच्या साथीदाराने मिळून सुमारे ५ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा ऐवज व रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सुयोग संतोष बेलवलकर (30, व्यवसाय- हॉटेल, रा. कळमुंडी, हनुमानवाडी, ता. चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३१ जुलै रोजी पहाटे ५ ते १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ या कालावधीत घर बंद असताना आरोपींनी घराच्या दर्शनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT