खेड : लोटे येथील पेट्रोल पंपात ड्रम मध्ये डिझेल भरताना कामगार. 
रत्नागिरी

Ratnagiri News : लोटेतील पेट्रोल पंपावर कृत्रिम टंचाई?

काळ्या बाजाराचा प्रयत्न ग्राहकांनी हाणून पाडला; कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे माळ येथील एका पेट्रोल पंपात डिझेलचा काळाबाजार होत असताना रांगेतील ग्राहकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. ही घटना १६ मे रोजी ११ च्या सुमारास घडली.

आखातातील युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी पेट्रोलजन्य पदार्थांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी, संपूर्ण जगाला इंधन टंचाईला सामोरे जावे लागत आहे. भारतातही हा प्रश्न गंभीर बनला आहे. याचा थेट परिणाम कोकणातील पर्यटन, व्यवसाय, उद्योग, लग्नसराई आणि वैयक्तिक मानवी जीवन यावर झाला आहे. अशातच काही पेट्रोल पंपांना इंधन मिळालेच तर ते आणीबाणीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच प्रकार महामार्गावरील लोटेमाळ येथे असणाऱ्या एका पेट्रोल पंपात घडला.

खेड तालुक्यातील असगणी गावचे ग्रामस्थ हुसेन घारे हे आपल्या ताब्यातील गाडी घेऊन या पंपावर आले असता पेट्रोल, सीएनजी आणि डिझेल या तिन्ही प्रकारांना वेगवेगळ्या रांगा होत्या. यावेळी रांगेतील वाहनांना डिझेल देण्याऐवजी एका कारखान्यातून आलेल्या पिकअप टेम्पो (एम.एच.-०८- डब्ल्यू- ०८७८) मध्ये ठेवलेल्या ड्रममध्ये २००० लिटर डिझेल देण्याचा प्रकार चालू होता. यातील सहा ड्रम डिझेलने भरून झाले होते. आणखी एका ट्रॅक्टर मध्ये ( एम.एच.-११-बी.ए.-०८३५ ) ड्रम ठेवले होते त्यामध्ये सोळाशे लिटर डिझेल भरले जाणार होते. मात्र रांगेत असलेल्या हुसेन घारे यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT