Leopard Terror 
रत्नागिरी

Ratnagiri Leopard Terror : आरळ्याच्या मध्यवस्तीत बिबट्याचा वावर!

वारंवार दर्शनाने ग्रामस्थांत भीती

पुढारी वृत्तसेवा

वारणावती : आरळा (ता. शिराळा) गावाच्या मध्यवस्तीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास नांगरे गल्ली येथे रस्त्याच्या मध्यभागी बिबट्या उभा असल्याचे दिसून आले. यावेळी बाबुराव कळंत्रे यांच्या घराच्या गच्चीवर असलेले प्रथमेश बाबुराव जाधव यांनी मोबाईलमध्ये बिबट्याचे छायाचित्र टिपले.

यापूर्वी गावातील अन्य गल्लीतून घरी जात असताना मिलिंद तुपारे यांनाही बिबट्याचे दर्शन झाले होते. तसेच दहा ते पंधरा दिवसांपूर्वी दोन महिलांनी बिबट्याला पाहिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या घटनांची माहिती ग्रामस्थांनी दूरध्वनीद्वारे प्रादेशिक वन विभागाला दिली आहे. मात्र, गावाच्या मध्यवस्तीत बिबट्याचा वावर वाढत असतानाही वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान, आरळा परिसरातील बेरडेवाडी, भाष्टेवाडी, मिरुखेवाडी, येसलेवाडी व गुंडगेवाडी आदी वाड्या-वस्त्यांवर वन्यप्राण्यांकडून शेळ्या, कुत्री, कोंबड्या आणि अन्य पाळीव जनावरांवर हल्ले होण्याच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे पशुपालकांचे नुकसान होत असून, आता गजबजलेल्या बाजारपेठेच्या गावातही बिबट्याचा वावर वाढल्याने मानवी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वन विभागाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून परिसरात गस्त वाढवावी, आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे व कॅमेरे लावावेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात. भविष्यात एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वी वन विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी आरळा व परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT