Online Fraud Pudhari News Network
रत्नागिरी

Ratnagiri News : केवायसी लिंंकच्या बहाण्याने पावणेतीन लाखांची फसवणूक

मंडणगड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मंडणगड : बँक ऑफ इंडियाच्या केवायसी अपडेटच्या नावाखाली मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करून अज्ञात व्यक्तीने मंडणगड तालुक्यातील पालगडमधील व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ७६ हजार रुपये ऑनलाईन लंपास केल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० ते २२ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात २६ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुनील धोंडू माळी (वय ४७, रा. पालगडकोंड, ता. मंडणगड) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीविरूद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६ (क), (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ॲप्‍लिकेशन लिंकवर क्लिक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर अशोक नटे (रा. रापट, ता. मंडणगड) यांच्या मोबाईल क्रमांकावरून आलेल्या बँक ऑफ इंडियाच्या केवायसी ॲप्‍लिकेशन लिंकवर क्लिक करण्यात आले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या बँक खात्याशी संबंधित माहितीचा गैरवापर करून ऑनलाईन व्यवहार केले. या फसवणुकीत फिर्यादीच्‍या बँक खात्यातून एकूण २ लाख ७६ हजार रुपये परस्पर ऑनलाईन वळते करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT