गुहागर, पुढारी वृत्तसेवा : कोकणात शिमगोत्सवाची धूम जोरात सुरू आहे. होळीचा पहिला टप्पा झाल्यानंतर आता कोकणात ग्रामदेवतांच्या पालख्या घरोघरी फिरणार आहेत. अनेक ठिकाणी गुरुवारी होळीच्या दिवशी होम लावण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी तिथीनुसार हे होम लावले जातात. त्यानंतर अनेक ठिकाणी ग्रामदेवतांच्या पालख्या वाडीवस्तीवर फिरतात. साधारणता गुढीपाडव्यापर्यंत हा शिमगोत्सव अनेक गावांमध्ये चालू असतो. तर काही ठिकाणी मे पर्यंत देखील पालख्या घरोघरी फिरतात. कोकणातील हा शिमगोत्सव आजही एक वेगळेपणा जपून आहे. (Ratnagiri Holi 2025)