Kidnapping Case  Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri News : अपहरण झालेल्या मुलीला शोधण्यात खेड पोलिसांना यश

मुलगी सुखरूप परतल्याने कुटुंबीयांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

खेड : 21 मार्च रोजी मध्यरात्री 2.30 वाजता अपूर्वा कदम हिचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या मुलीबाबत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत 24 एप्रिल रोजी मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला सुरक्षित पोलिस ठाण्यात आणले.

अपूर्वाची आई अस्मिता अरुण कदम (40) यांनी तातडीने खेड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. यानंतर पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समेल सुर्वे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व स्थानिक माहितीदारांच्या मदतीने शोधमोहीम वेगात राबवली. दरम्यान, मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही नियुक्त केले होते. शोध मोहीम सुरू असतानाच खेड पोलिस ठाण्याच्या महिला व बाल कक्षातील महिला पोलिस विशाखा चव्हाण व जयश्री जाधव यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. याआधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत 24 एप्रिलला मुलीला ताब्यात घेतले.

त्‍यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आल्या. तिची ओळख व स्थिती याबाबत खातरजमा करून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अपूर्वा हिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. मुलगी सुखरूप परतल्याने कुटुंबीयांनी दिलासा व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT