Ratnagiri Crime News Pudhari File Photo
रत्नागिरी

Ratnagiri Crime : खेडजाई मंदिराजवळ शेतात आढळला तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

खेड : तालुक्यातील खेडजाई मंदिराजवळील शेतामध्ये एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बाळ विठ्ठल वाले (वय ३२, सध्या रा. कुंभारवाडा, खेड; मूळ रा. लक्ष्मीनगर, कपवाडा रोड, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बाळ वाले हे खेड येथील सेक्युरिटी ऑफिसमध्ये काम करत होते. मात्र ते १० मे २०२पासून कामावर येत नसल्याची माहिती त्यांच्या भावाला मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद लागत होता. बाळ वाले यांना अधूनमधून कुठेतरी निघून जाण्याची सवय असल्याने कुटुंबीयांनी काही दिवस वाट पाहिली.

दरम्यान, १९ मे रोजी रात्री खेड पोलीस ठाण्यात भाऊ बेपत्ता असल्याची माहिती देण्यासाठी त्यांचे भाऊ खंडू विठ्ठल वाले गेले असता, खेडजाई मंदिराजवळ शशिकांत राजाराम दांडेकर यांच्या शेतात एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत उपड्या स्थितीत पडलेला होता. अंगावरील कपडे तसेच डोक्यावरील टकलावरून त्यांनी मृतदेहाची ओळख आपल्या भावाची असल्याचे निश्चित केले. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT