रत्‍नागिरी काशीविश्वेश्वर-भैरी भेट सोहळ्यात भक्त तल्लीन 
रत्नागिरी

Ratnagiri News : रत्‍नागिरी काशीविश्वेश्वर-भैरी भेट सोहळ्यात भक्त तल्लीन

हजारो भक्तांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शहरातील राजीवडा येथील श्रीदेव काशीविश्वेश्वर आणि रत्‍नागिरीचे ग्रामदैवत मांडवी येथील श्रीदेव भैरी या दोन देवांच्या भेटीचा अभूतपूर्व सोहळा भक्तांनी अनुभवला. ‘काय वर्णू ती मी शोभा आजच्या दिनाची, भेट झाली पहा हो भैरी-शिवाची’ या अभंगाच्या तालावर दोन्ही देवांची भेट होत असताना हजारो भक्तगण तल्लीन झाले होते.

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी श्री देव काशीविश्वेश्वराच्या भेटीला श्री देव भैरीची पालखी राजीवडा येथे येते. श्रावणातील पहिल्या सोमवारी श्री देव काशिविश्वेश्वर आणि श्री भैरी देवाच्या मंदिरांमध्ये नामसप्ताह सुरू होतो. दुसऱ्या सोमवारी नामसप्ताहाची सांगता होते. यावेळी दोन्ही देवांच्या पालखीतून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघाल्‍या. या सोहळ्यात हजारो भक्तगण सहभागी झाले होते.

श्री देव काशीविश्वेश्वराच्‍या पालखीने राजीवड्यातील मंदिराभोवती ५ प्रदक्षिणा घातल्‍या. यातील तिसऱ्या प्रदक्षिणेवेळी श्री देव भैरी देवाच्या पालखी भेटीचा सोहळा पार पडला. शहरातील मांडवी येथील श्री भैरी देवाची पालखी विठ्ठल मंदिर-तेली आळी नाका, खडपेवठार मार्गे राजीवडा धारेवरून श्री काशीविश्वेश्वराच्या भेटीसाठी मंदिराच्या दिशेने आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT