मृत्यू 
रत्नागिरी

Ratnagiri News : जयगड बंदरातील जहाजावरील इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू

जयगड सागरी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : अरेबियन समुद्रात ‘एमव्ही रेक एलिट’ या जहाजावर १० एप्रिल रोजी झालेल्या दुर्घटनेत इजिप्तच्या ३५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. इस्लाम आदेल अहमद अब्देल लतिफ असे मृताचे नाव असून ते या जहाजावर सेफ्टी ऑफिसर व थर्ड ऑफिसर म्हणून कार्यरत होते. याप्रकरणी जयगड सागरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० एप्रिल रोजी दुपारी १.३० च्या सुमारास अरेबियन समुद्रात ‘एमव्ही रेक एलिट’ जहाजावर ही दुर्घटना घडली. घटनास्थळाचे स्थान १४.१० उत्तर अक्षांश आणि ५५.२८ पूर्व रेखांश असे नमूद करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर ‘एमव्ही रेक एलिट’ हे जहाज १६ एप्रिल रोजी दुपारी १२.४५ वाजता रत्‍नागिरी तालुक्‍यातील जयगडमधील जेएसडब्ल्यू बंदरात दाखल झाले. यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटद-खंडाळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून संबंधित घटनेची माहिती प्राप्त झाली. घटनास्थळ मुंबईतील यलो गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत नसल्याने तेथील कागदपत्रे रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणाची पुढील चौकशी जयगड सागरी पोलिस ठाण्यामार्फत करण्याचे आदेश प्राप्त झाले. पोलिस अधीक्षक कार्यालयातून प्रकरण जयगड सागरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.२६ वाजता अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT