फिरत्या हॉटेल व्यवसाय कामगाराचा रत्नागिरीत मृत्यू Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri News : फिरत्या हॉटेल व्यवसाय कामगाराचा रत्नागिरीत मृत्यू

रत्नागिरीनजीक हातीस येथील उरुसास आले असता दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः हातीस येथील उरुसानिमित्त फिरत्या हॉटेलचा व्यवसाय करण्यासाठी आलेल्या पुणे येथील कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.40 वा. सुमारास घडली.

विजय रामभाऊ लाड (70,रा. संगमनगर भोकड सांगवी, पुणे) असे या कामगाराचे नाव आहे. याबाबत हॉटेल मालक बाळू दादा भोसले (रा.विरंगानगर लिंक रोड पंढरपूर, सोलापूर) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, बाळू भोसले यांचा फिरत्या हॉटेलचा व्यवसाय आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये विजय लाड हे जेवण बनवण्यासाठी कामाला होते. सन 2025 मध्येही पंढरपूरहून हातीस येथील उरुसानिमित्त बाळू भोसले यांनी आपले हॉटेल लावले होते. त्यावेळेही विज्ाय लाड त्यांच्यासोबत जेवण बनवण्यासाठी आले होते. या वर्षी 2026 मध्ये हातीस उरुस असल्याने हॉटेल मालक बाळू भोसले हे कामगार विजय लाड यांना घेउन हातीसला आले होते. तिथे त्यांनी आपले सुनील कॉर्नर हे हॉटेल थाटले होते.

दि.2 फेब्रुवारीला रात्री 10 वा. सुमारस विज्ाय लाड यांच्या छातीत डाव्या बाजुला दुखू लागल्याने हॉटेल मालक बाळू भोसले यांनी त्यांना बाजूला असलेल्या राहुटीमध्ये आराम करण्यासाठी सांगितले. मध्यरात्री 2.30 वा.सुमारास सर्व काम आटोपल्यावर सर्वजण झोपले होते. त्या नंतर पहाटे 3.30 वा.सुमारास उरुसातील लोकांचा मोठ्याने आवाज येउ लागल्याने बाळू भोसले यांनी जाउन पाहिले असता त्यांना विजय लाड हे एका खुर्चीवर बेशुद्धावस्थेत दिसून आले. तसेच त्यांच्या तोंडातून फेसही येत असल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.40 वा.सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विजय लाड यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT