Ratangiri Crime | गिमवी येथे रानडुकराच्या शिकार प्रकरणी तिघेजण ताब्यात  
रत्नागिरी

Ratnagiri Crime | गिमवी येथे रानडुकराच्या शिकार प्रकरणी तिघेजण ताब्यात

वनविभागाची कारवाई, डबल बार 12 बोर बंदूकीसह, वाहन ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

गुहागर : तालुक्यातील गिमवी येथे रानडुक्कराच्या शिकारप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले. चिपळूण वनविभागाने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक 23 रोजी मौजे गिमवी येथील गाव हद्दीत एक संशयित ४०७ टेम्पो वीणा नंबर प्लेटची थांबून तपासले असता सदर वाहनाच्या हवाद्या मध्ये एक मोठे रानडुक्कराची  शिकार करून ठार मारून ठेवलेले, तसेच त्या वाहनामध्ये एक डबल बार 12 बोर बंदूक आढळून आली, सदरची शिकार ही प्रसाद सुभाष सोमण,रोशन रमेश मोरे, संदीप वसंत गावडे सर्वजण रा.गिमवी ता. गुहागर हे आरोपी सापडून आले.

सदरचे वन्य प्राणी मृत रानडुक्कर ,४०७ टेम्पो , 3 आरोपींसह ताब्यात घेऊन वन्यजीव (संरक्षण)अधिनियम ,१९७२ अन्वे कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे. सदरची कारवाई गिरीजा देसाई पाटील, मा.विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण), श्रीम.प्रियंका लगड सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरवर खान, मा.वन परिक्षेत्र अधिकारी, चिपळूण, अमित निमकर, वनपाल गुहागर, एस एस सावंत, वनपाल चिपळूण, सिद्धेश्वर गायकवाड, वनरक्षक रानवी, अरविंद मांडवकर, वनरक्षक अडूर, कुमार पवार, वनरक्षक आबलोली, राहुल गुंठे, वनरक्षक रामपूर, कृष्णा इरमले यांनी कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT