गावखडी रामेश्वर मंदिरात घुमला ‌‘हर हर महादेव‌’चा गजर 
रत्नागिरी

Ratnagiri News : गावखडी रामेश्वर मंदिरात घुमला ‌‘हर हर महादेव‌’चा गजर

महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांंची अलोट गर्दी; पहिल्या दिवशी बांधली अकरा खांबाची व एकवीस पायली तांदळाची महापूजा

पुढारी वृत्तसेवा

पावस : ‘ओम नमः शिवाय‌’ जप करीत ‌‘हर हर महादेव‌’ अशी गर्जना करीत हजारो शिवभक्तांंनी रत्नागिरी तालुक्यातील गावखडीचे जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर मंदिरात श्री देव रामेश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्री महोत्सवानिमित्त अलोट गर्दी केली होती.

श्रीदेव रामेश्वर जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा असल्यानेच मुंबई, पुणे, राजापूर, रत्नागिरीतील ठीकठिकाणाहून माहेरवासिणी गावखडी गावाकडे पाच दिवस महाशिवरात्री महोत्सवानिमित्त आले आहेत. महाशिवरात्री दिवशी 11 खांबांची आणि 21 पायली तांदळाची महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा बांधण्यासाठी भक्तगण मोठ्या भक्तिभावाने तांदूळ देतात. अशी महापूजा इतरत्र पहावयास मिळणे दुर्मीळ आहे. या तांदळाने बांधलेली महापूजा भक्तगणांची आकर्षण असते. त्याचप्रमाणे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त पाच दिवस विविध क्रीडा स्पर्धा विविध नाट्य प्रयोग भजन, कीर्तन, पालखी सोहळा, आरती असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

सतत पाच दिवस म्हणजे 120 तास हा शिवरात्री महोत्सव गावखडी श्रीदेव रामेश्वर मंदिरात साजरा केला जातो. महाशिवरात्री महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र गावखडी भक्तिरसात चिंब भिजून गेली आहे. गावखडीतील श्रीदेव रामेश्वराचा शिवरात्री महोत्सव मोठ्या थाटात भजक्तिमय वातावरणात श्री देव रामेश्वर उत्सव मंडळाचे अध्यक्ष रविकिरण धर्माजी तोडणकर, श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष पद्माकर तोडणकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व शिवभक्त, ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने मोठ्या भक्तीभावाने मांगल्य एकोप्याने मोठ्या दिमाखात हा महाशिवरात्री महोत्सव साजरा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT