कार्यकर्त्यांना लागले गणेशोत्सवाचे वेध  
रत्नागिरी

Ratnagiri news : कार्यकर्त्यांना लागले गणेशोत्सवाचे वेध

रत्नागिरी : बाप्पाच्या उत्सवात लहानग्यांसह तरुणाईमध्ये पारंपरिक वाद्यांची क्रेझ

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : लाडक्या बाप्पाचे वाजतगाजत स्वागत करण्यासाठी गणेशोत्सवात ढोल- ताशा ध्वज पथकाला मोठी मागणी असते. जिल्ह्यात लहानग्यांसह तरुणाईमध्ये ढोल-ताशा या पारंपरिक वाद्याची क्रेझ पाहायला मिळते. ताल व लयबद्ध वादनाने ढोलताशा पथक सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या ठिकठिकाणी ढोल- ताशा पथकातील सदस्य कसून सराव करताना दिसत आहेत.

वरुणराजा बरसत असताना जिल्ह्यात सर्वत्रच कानावर ढोलकी, टाळ तसेच ढोल-ताशांचे आवाज सध्या येत आहे. जिल्ह्यात अनेक ढोलताशा पथक आहेत. डिजे व बॅन्जोपेक्षा आता पारंपरिक वाद्यांना सध्या मागणी वाढत आहे. गणेशोत्सव, शिवजयंती, शिवराज्याभिषेक, नवरात्र, पाडवा अशा विविध सणांमध्ये मिरवणक. शोभायात्रांमध्ये हमखास ढोल- ताशा पथकांना आमंत्रित केले जाते. या पथकांकडून सामाजिक उपक्रमही राबवले जातात. गणेशोत्सवाच्या बाप्पांचा साधारण दीड- महिने आधीपासून शक्ती-तुरा नाचासाठी तसेच ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू होतो. बहुतांश पथक सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सराव करतात.

यात अवघ्या सहा वर्षांपासून 45 वर्षांपर्यंतचे सदस्य असतात. तर काही जण केवळ हौसेखातर प्रशिक्षण घेतात. सदस्यांना सरावासाठी नियमित हजर राहून मेहनत घ्यावी लागते. जिल्ह्यात ढोल ताश्यांबरोबरच शक्ती-तुरा नाचाची डबल बारी रंगते. त्याच्या जोडीला भजनही असते. हे सर्व कलाकार सध्या सराव करताना दिसत आहेत. घरोघरी उत्सवाच्या कालावधीत हे सर्व पहायला मिळते.

नवीन ठेका-तालाचे प्रशिक्षण

बहुतांश ढोलपथक आपला नवीन ठेका व ताल यांचा वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करतात. यात 1 ते 5 असे पारंपरिक ताल असतात. याला पारंपरिक हात चालवणे असेही म्हटले जाते. तर काही ठिकाणी प्रशिक्षणासाठी पथकातील तज्ज्ञांना बोलावले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT