गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात 15 कोटींची उलाढाल 
रत्नागिरी

Ganesh Chaturthi : गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात 15 कोटींची उलाढाल

बाजारात मिठाई, फराळ, फुलांसह विविध साहित्य, दागिन्यांची खरेदी वाढली

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी शहरासह तालुक्यातील बाजारपेठामध्ये खरेदीसाठी मोठी झुंबड पाहावयास मिळाली. गणेशभक्तांनी ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन खरेदीला पसंती देत उत्साहात खरेदी केली. मिठाई, फराळ, फुले, बाप्पांची मूर्ती, दागिने यासह विविध वस्तूंची खरेदी गणेशभक्तांनी केली. यंदाच्या वर्षी व्यापार्‍यांवर लाडका बाप्पा प्रसन्न झाला असून गणेशोत्सवापूर्वी व नंतरच्या खरेदीमुळे तब्बल 15 कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

गणेशोत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने कोकणवासीय मूळ गावी कोकणात दाखल झाले असून कोकण गजबजले आहे. जिल्ह्यात दीड लाखांहून अधिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. मूर्तीकारांनी एकापेक्षा एक गणेशमूर्ती बनवून विक्रीस आणले होते. यंदा साहित्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे गणेश मूर्तींच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाल्यांची दिसून आली. गणेशमूर्तीबरोबर सजावटीचे माळा, झुंबर, मण्यांच्या माळा यासह व्विध साहित्याची विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल झाली. तसेच विविध प्रकारचे पेढे, मोदक, लाडू, चिवडा, फरसाण, उकडीचे मोदकची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. गौरीसणासाठी विविध फराळाची ऑर्डर मिठाईवाल्यांना देण्यात आल्यामुळे त्यातून ही लाखोंची उलाढाल झाली आहे. फुलांचे दर वाढल्यामुळे प्लास्टिकचे साहित्यातून सजावट करण्यात आली. तरी तसेच पुजेसाठी लागणार्‍या दुर्वाच्या जुड्या, दुर्वापासून तयार केलेले हार, झेंडू, गुलाब, शेवंता, यासह नैवैद्यासाठी लागणारे पाच फळ विविध फळांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तसेच विविध जणांनी मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी केली तर काहींनी सोन्याची खरेदी केली. पुजेच्या साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली असे एकूण 15 ते 20 कोटींची उलाढाल झाल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

गणेशोत्सवापूर्वी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे यंदाचा उत्सव व्यावसयिकांसाठी चांगला होता. पंरतु नंतर सततच्या पावसामुळे थोडासा फटका व्यावसायाला झाला आहे. तरीही यंदाच्या वर्षी चांगला व्यवसाय झाला. थोड्या प्रमाणात नागरिकांनी ऑनलाईन खरेदी केली आहे.
गणेश भिंगार्डे शहराध्यक्ष, व्यापारी महासंघ, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT