financial scam | Pudhari Photo
रत्नागिरी

Ratnagiri Fraud : बांधकामाच्या कंत्राटात ८०.१७ लाखांचा गंडा

नाशिक, पुण्यातील चौघांवर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी येथील कोस्टगार्ड बांधकाम प्रकल्पातील उपकंत्राटाच्या कामात पुण्यातील एका महिला इंटिरियर डिझायनर व कंत्राटदाराची ८० लाख १७ हजार ८३६ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक येथील मुख्य कंत्राटदार कंपनीच्या मालकासह पुण्यातील चार जणांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुण्यातील वारजे (अतुलनगर, यश अपार्टमेंट) येथील रहिवासी आणि ‘अंतरा डिझाईन स्टुडिओ’च्या संचालिका अश्विनी सुनील आंबेकर (३४) यांनी २३ नोव्हेंबर रोजी रात्री रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दिगंबर आनंदराव पिंगळे (मालक, मेसर्स प्राड इन्फ्रा कंपनी, रा. नाशिक), श्रीधर सुरेंद्र लोंढे (प्रकल्प व्यवस्थापक, रा. पुणे), दिनेश नाडगोंडे (प्रकल्प समन्वयक, रा. पुणे) आणि राजू खेतावत (मालक, श्रुती असोसिएटस, रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

नाशिक येथील ‘मेसर्स प्राड इन्फ्रा’ कंपनीला कोस्टगार्ड रत्नागिरी येथे बांधकामाचा ठेका मिळाला होता. या कंपनीचा मालक दिगंबर पिंगळे याने फिर्यादी आंबेकर यांच्याशी रितसर करार करून १५ जून २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोस्टगार्डच्या झाडगाव येथील ‘मॅरीड अकोमोडेशन’ (एस+७ व ८ बिल्डिंग) इमारतीचे फिनिशिंग वर्क आणि मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेसच्या ओटीएम गॅरेजचे आर.सी.सी. स्लॅब लेबर वर्क दिले होते. फिर्यादींनी हे काम पूर्ण केल्यानंतर फिनिशिंग कामाचे अंतिम बिल ५५ लाख १२ हजार ५०५ रुपये आणि गॅरेज स्लॅब कामाचे जीएसटीसह बिल २५ लाख ५ हजार ३३१ रुपये, अशी एकूण ८० लाख १७ हजार ८३६ रुपयांची रक्कम थकीत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT