सरकारी मोजणीनंतर जमिनीच्या वादातून चौघांना मारहाण Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri News| सरकारी मोजणीनंतर जमिनीच्या वादातून चौघांना मारहाण

पाच जणांवर गुन्हा; काठ्या, प्लास्टिक खुर्चीने हल्ला

पुढारी वृत्तसेवा

लांजा : घरपरसातील जमिनीच्या वादातून सरकारी मोजणी झाल्यानंतर झालेल्या वादात चौघांना काठ्या व प्लास्टिक खुर्चीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना पालू-कुंभारवाडी येथे बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी लांजा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत स्नेहल मनोहर साळवी (३२, सध्या रा. गणेशनगर, वडाळा पूर्व, मुंबई) यांनी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चंद्रकांत धोंडू देवळेकर, दिनेश धोंडू देवळेकर, सत्यवान धोंडू देवळेकर, प्रभात दिनेश देवळेकर आणि सचिन सत्यवान देवळेकर (सर्व रा. पालू-कुंभारवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरपरसातील जमिनीच्या वादातून सरकारी मोजणी करण्यात आली होती. मोजणीनंतर संशयितानी स्नेहल साळवी, नामदेव शंकर साळवी, मनोहर शंकर साळवी, मधुरा मनोहर साळवी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काठ्या आणि प्लास्टिक खुर्चीने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चौघांना दुखापत झाली.

तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली असून, त्याच दिवशी दुपारी २.०६ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास लांजा पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT