रत्नागिरी : रत्‍नदुर्गवर शस्‍त्रपूजनावेळी मावळ्यांसह रणरागिणी. 
रत्नागिरी

Ratnagiri News : ‘आधी तोरण गडाला, मग घराला!’ संकल्‍पनेतून गड संवर्धन

रत्नागिरी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे किल्ले रत्नदुर्गावर गडपूजन, शस्त्रपूजन सोहळा

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आधी तोरण गडाला, मग घराला!’ या संकल्पनेतून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागातर्फे किल्ले रत्नदुर्ग येथे गडपूजन व शस्त्रपूजन सोहळा पारंपरिक उत्साहात झाला. महादरवाजा परिसरातील हनुमान मंदिर येथे आयोजित या सोहळ्यात ऐतिहासिक वारशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा आणि महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती जतन करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यापूर्वी प्रतिष्ठानच्या मावळे व रणरागिणींनी किल्ले रत्नदुर्गाच्या महादरवाजा परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर ऐतिहासिक महादरवाजाला तोरण बांधून गडाला मंगलमय स्वरूप प्राप्त करून देण्यात आले.

पारंपरिक पद्धतीने गडपूजन व शस्त्रपूजन करून दसरा साजरा करण्यात आला. या उपक्रमाला प्रतिष्ठानच्या मावळे व रणरागिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर व त्यांचे सहकारी प्रमुख उपस्थित होते. या मोहिमेत सहभागींच्या एकजुटीने आणि उत्साहपूर्ण सहभागाने परिसरात शिवकालीन परंपरेचा व ऐतिहासिक वारशाविषयीच्या अभिमानाचा प्रत्यय आला.

गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या शौर्याचे, स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहेत. या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे, स्वच्छता राखणे आणि त्यांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याच विचारातून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे सातत्याने संवर्धनात्मक व जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT