रत्नागिरी : गणेशोत्सवाचा उत्सव संपल्यानंतर रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील मच्छी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी वाढत आहे. श्रावण,गणेशोत्सवामुळे नागरिक मांसाहाराचे पदार्थ टाळले होते. पण आता लाडक्या बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर मटण, मच्छीवर नागरिक ताव मारत असून दुकान, मार्केटमध्ये विविध प्रकारचे मासे खरेदीसाठी झुंबड पहावयास मिळत आहे. पापलेट, सुरमई, बांगडा,कोळंबीसह विविध माशांना मागणी वाढली आहे. मासे महागली असली तर मोठ्या प्रमाणा मटन, मच्छीची विक्री होत असल्यामुळे दुकानदारांची,मच्छी विक्रेत्यांची चांदी झाली आहे.
श्रावण, गणेशोत्सवामुळे मत्स्यखवयांनी मच्छी खरेदीसाठी पाठच फिरवली होती.त्यामुळे मच्छी मार्केट ओस पडले होते.गणेशोत्सवानंतर आता ओस पडलेले मटण, मच्छी मार्केट पुन्हा गजबजले आहे. रत्नागिरी येथील मच्छी मार्केट, जेटीसह तालुक्यातील विविध ठिकाणच्या बाजारात मच्छी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मार्केटमध्ये विविध प्रकारच्या मच्छी विक्रीस उपलब्ध झाले आहेत. पापलेट, बांगडा, कोळंबी, सुरमई, रावस, सौंदळ यासह विविध मासे ग्राहक खरेदी करीत आहेत. किरकोळ मच्छीविक्रेते ही घरोघरी जावून मच्छी विक्री करीत असून काहीप्रमाणात माशांचे भाव वाढले असले तरी ग्राहक जोमाने मासे खरेदी करीत आहेत.
श्रावण, गणेशोत्सवामुळे मच्छी मार्केटमध्ये शुकशुकाट होता. आता पुन्हा एकदा मार्केटमध्ये गर्दी वाढली आहे. गणेशोत्सवानंतर खवय्यांनी विविध मासे खरेदी केली आहे. त्यामुळे मच्छी, चिकन, मटण विक्रेत्यांची चांदी झाली आहे.
-पापलेट-1600 रूपये किलो (आकारानुसार)
- सुरमई- 1300 रूपये किलो (आकारानुसार)
- मोरी मासा- 600 ते 800 रूपये किलो
- बांगडे- 300 ते 400 रूपये किलो
- हलवा- 1200 ते 1300
- कोळंबी- 400 ते 500 रूपये किलो